आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nila Vikhe Become Advisor To Prime Minister Of Sweden

राधाकृष्ण विखे-पाटलांची पुतणी बनली स्वीडिश पंतप्रधानांची सल्लागार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नीला विखे पाटील यांची स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागारपदी नियुक्ती झाली. 30 वर्षीय नीला या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे यांची नात व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. अशोक विखे पाटील यांची कन्या आहे, तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेंच्या पुतणी आहेत.

स्वीडन मध्ये जन्मलेल्या नीलाने आपल्या बालपणाचा काही काळ अहमदनगर मध्ये घालविला आहे. तिने गोटेनबर्ग बिझनेस महाविद्यालयातून अर्थशास्त्र व कायदा या विषयात पदवी घेतली. त्यानंतर माद्रिद (स्पेन) विद्यापीठातून एमबीए केले. पदवी शिक्षणात संघटनात्मक व्यवस्थापन तर पदव्युत्तर शिक्षणात आर्थिक व्यवस्थापन, लेखा, व्यापार कायदा या विषयात विशेष शिक्षण घेतले आहे.

स्टॉकहोम महानगरपालिका निवडणुकीत समिती सदस्य व स्टॉकहोम जिल्हा न्यायालयात ज्युरी म्हणून नीलाने काम केले आहे. विद्यार्थीदशेत नीला हिने स्वीडन मधील ग्रीन पार्टी, स्वीडीश यंग ग्रीन्समध्ये काम केल्याचा तिला फायदा झाला.

पुढील स्लाइडवर पाहा, स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयाच्या सल्लागार नीला विखे पाटील यांचे फोटोज...