आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nilesh Rane In Difficult, Ncp Local Leaders Not Support At Konkon

कोकणात राणेंच्या अडचणीत भर, राष्ट्रवादीच्या 400 पदाधिका-यांचे राजीनामे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रत्नागिरी-सिंधूदुर्ग लोकसभा मतदारसंघात उद्योगमंत्री नारायण राणे यांची विरोधकांनी सर्व बाजूंनी कोंडी केल्यानंतर आता जनतेकडून त्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे. नारायण राणेंचे चिरंजीव डॉ. निलेश राणे यांच्या प्रचार न करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी घेतल्याने राणेंसह काँग्रेसच्या अडचणीत भर पडत चालली आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी राणेंचा प्रचार करण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक नेत्यांसह पदाधिका-यांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे राणेंनी राष्ट्रवादीवर दबाव आणला आहे. असे असले तरी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते कोणत्याही दबावाला बळी पडत नसल्याचे चित्र आहे. पक्षतील नेत्यांनी फटकरल्याने सिंधूदुर्गमधील सुमारे 400 पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळा भिसे यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत राणेंसाठी प्रचार करू शकत नाही. तरीही पक्षाचा आदेश असले तर आम्ही आपले राजीनामे सादर करीत आहोत ते मंजूर करावेत अशी या पदाधिका-यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर यांनी उघडच राणेंना विरोध केला आहे. यासह सर्वच छोट्या-मोठ्या पक्षांनी राणेंच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी व सिंधूदुर्ग जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी निलेश राणेंना मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकणातील विविध प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांनीही विरोध केला. राज ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे बोलले जात होते. मात्र या दोघांत सध्या बेबनाव झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे मनसेही राणेंना मदत न
करता नोटा वापरण्याचा निर्णय घेतल्याचे कळते. दुसरीकडे, शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांच्यासाठी भाजप-शिवसेनेत चांगली एकजूट असल्याचे चित्र आहे. विविध संस्था, संघटनांचा राऊत यांना पाठिंबा मिळत आहे. याचबरोबर सर्वपक्षीयांचा अंतर्गत पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राणे यांच्यासाठी हा लोकसभा निवडणूक सोपी नाही हे स्पष्ट होत आहे.