आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊत जिथे दिसतील तिथे त्‍यांना फटके मारणार- निलेश राणे यांची थेट धमकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्‍या सामनामधून प्रकाशित झालेल्‍या व्‍यंगचित्रावरून चांगलाच राजकीय वाद रंगला आहे. काल सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी सामनाची भूमिका मांडली. मात्र, आता या वादात काँग्रेस नेते नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी उडी घेतली आहे. संजय राऊत जिथे दिसतील तिथे त्यांना फटके मारणार असे धमकी देणारे ट्विटच निलेश राणे यांनी केले आहे. शिवाय या ट्वीटमध्‍ये निलेश यांनी संजय राऊत यांचा एकेरी शब्‍दात उल्‍लेख केला आहे.
आपल्‍या विविध मागण्‍यांसाठी राज्यात सध्‍या मराठा समाज लाखोंच्‍या संख्‍येने रस्‍त्यावर उतरत आहे. शहराशहरांमधील मराठा क्रांती मोर्चे ऐतिहासिक ठरत आहेत. या मोर्चासंदर्भात सामनामध्ये एक आक्षेपार्ह व्यंगचित्र छापून आले होते. त्‍यानंतर मराठा समाजबांधवांनी सामना या मुखपत्राचा ठिकठिकाणी निषेध नोंदवला. सामनाच्‍या कार्यालयावर दगडफेकही करण्‍यात आली होती. यासंदर्भात विविध राजकीय प्रतिक्रीया आल्‍यानंतर काँग्रेस नेते निलेश राणे यांनीदेखील ट्विटरवरुन या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
राजीनामा देणा-या पदाधिका-याचा फोटो केला शेअर..
निलेश राणे यांनी एका ट्विटमध्ये व्यंगचित्राविरोधात राजीनामा देणा-या एका शिवसेनेच्या पदाधिका-याचा फोटो शेअर केला आहे. ‘हा स्वाभिमान, हाच खरा वाघ’ अशा ओळीही त्यांनी फोटोसोबत लिहील्‍या आहेत. संजय राऊत यांच्याविषयी ट्विट करताना निलेश राणे यांनी त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली आहे. याआधी नितेश राणे यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. असीम त्रिवेंदी यांना व्यंगचित्रावरुन अटक होऊ शकते तर संजय राऊत संपादक असलेल्या सामनात छापून आलेल्या व्यंगचित्रासाठी राऊत यांनाही अटक व्हायला हवी, चुकीला माफी नाही असे नितेश यांनी म्हटले होते.
सुभाष देसाई यांचे स्‍पष्‍टीकरण...
शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी यासंदर्भातील स्‍पष्‍टीकरण दिले आहे. सामनातील व्यंगचित्र ही पक्षाची भूमिका नसल्‍याचे देसाई यांनी स्‍पष्‍ट केले आहे. काल संजय राऊत यांनीही विरोधकांवर टीका करताना म्‍हटले की, हा वाद मिटला असून वाद पेटवणारे लोक हे महाराष्ट्राचे वैरी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर निशाणा साधत हे लोकांची माथी भडकावण्‍याचे काम करत असल्‍याचे ते म्‍हणाले. शिवाय व्यंगचित्रावरुन नाराज झालेल्या शिवसेनेतील काही पदाधिका-यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना अडचणीत सापडली आहे.
नारायण राणे यांचीही टीका- ठाणे शहर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा गडकरी रंगायतनमध्ये बुधवारी आयोजित केला होता. या मेळाव्यात बोलताना नारायण राणे यांनी शिवसेना-भाजपवर कडाडून टीका केली, नारायण राणे यांचे वक्‍तव्‍य आम्‍ही पुढील स्‍लाइड्सवर दाखवत आहोत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, निलेश राणे यांची काय केले ट्विट..
पुढे वाचा-
> सामनावर दगडफेक झाल्‍यानंतर काय म्‍हणाले होते निलेश राणे..
> नारायण राणे म्‍हणाले, सामनातील शिपाई माफी मागणार का..
बातम्या आणखी आहेत...