आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nilesh Rane News In Marathi, Congress, Bhaskar Jadhav, Divya Marathi

मंत्री भास्कर जाधवांना पराभूत करणारच - नीलेश राणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र नीलेश यांच्या मनातून लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची निराशा अजून गेलेली नाही. राष्ट्रवादीच्या दगाबाजीमुळेच पराभव झाला अशी त्यांची भावना आहे. यातूनच राष्ट्रवादीचे मंत्री भास्कर जाधवांविरोधात गुहागरमधून अपक्ष लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. मात्र वडिलांच्या आदेशावरून त्यांनी हा निर्णय तूर्त मागे घेतला असला तरी जाधवांना पराभूत करण्याचे प्रयत्न करणारच असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

निलेश यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन जाधवांविरोधातील राग प्रकट केला. ते म्हणाले, उद्योगमंत्री नारायण राणे तसेच काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून आपल्याला उमदेवारी मागे घेण्यास सांगण्यात आल्यामुळे मी आता अपक्ष निवडणूक लढवणार नाही. मात्र जाधवांना पाडल्याशिवाय स्वस्थही बसणार नाही. त्यांच्या विरोधात प्रचाराचे रान उठवणार आहे.
निलेश म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युती झाली नाही आणि जाधवांच्या विरोधात लढण्याची कोणाची इच्छा नसेल तर काँग्रेस पक्षाने माझा नक्की विचार करावा. राणे परिवाराला त्रास देण्यासाठी राष्ट्रवादीचे काही नेते प्रयत्न करत आहेत, हे नेते कोण आहेत, त्यांची नावे लवकरच जाहीर करेन.

कोणाच्या सांगण्याने कोणाचा पराभव होत नाही : तटकरे
कोणीही उठतो आणि आघाडीचा नियम मोडून परस्पर आपली उमेदवारी जाहीर करतो. आता नीलेश राणे हे आमच्या मंत्र्यांचा पराभव करायला सरसावले आहेत. मात्र कोणाच्या सांगण्याने कोणाचा पराभव होत नसतो, हे नीलेश राणे यांनी लक्षात ठेवावे. दोन्ही पक्षांनी आघाडीचा धर्म पाळायला हवा, अशी प्रतििक्रया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.