आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तावडे यांच्या घरावर काँग्रेसचा मोर्चा, राजीनामा नाही तोपर्यंत आंदोलनाचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिक्षणमंत्रिपदी असतानाही सहा कंपन्यांचे संचालकपद भूषवणाऱ्या विनाेद तावडे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी बुधवारी काँग्रेसच्या वतीने तावडेंच्या विलेपार्लेतील निवासस्थानाबाहेर भव्य माेर्चा काढण्यात अाला. मंत्रिपदावर असतानाही लाभाचे पद स्वीकारणारे तावडे जाेपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत विविध मार्गांनी त्यांच्याविराेधात आंदोलने केले जातील, असा इशाराही या वेळी देण्यात अाला.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम व खासदार राजीव सातव यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. अामदार वर्षा गायकवाड व असलम शेख यांच्यासह कार्यकर्ते माेर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांनी तावडेंविराेधात घाेषणाबाजी केली.
‘मंत्रिपदावर असूनही तावडे सहा कंपन्यांचे संचालक अाहेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार हे कायद्याचे उल्लंघन आहे. त्यामुळे तावडेंनी तत्काळ राजीनामा द्यावा,’ अशी मागणी काँग्रेसने केली. ‘जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनोद तावडेंना मंत्रिपदावरून हटवत नाहीत, तोपर्यंत काँग्रेस पक्षातर्फे विविध प्रकारे आंदोलन सुरू राहील,’ असा इशाराही या वेळी देण्यात आला.
‘तावडेंचे शिक्षण बारावी नापास असून ते स्वतःला पदवीधर सांगतात. त्यांची पदवी खोटी आहे. त्यांचा दुसरा गुन्हा म्हणजे त्यांच्याकडे तीन डीआयएन नंबर आहेत. तसेच मंत्री झाल्यावरही सहा कंपन्यांवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्थावर आणि जंगम मालमत्ता दाखवणे बंधनकारक आहे, परंतु त्यांनी सगळे लपवून ठेवले होते. अशा भ्रष्टाचारी मंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही,’ असा आरोप संजय िनरूपम यांनी केला.
चव्हाणांचाही अाराेप
बिझनेस पार्टनर आणि मित्र दिलीप करंबळेकर यांना तावडेंनी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचा अध्यक्ष बनवले. मात्र, मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या सदस्यांच्या यादीत तावडेंच्या या मित्राचे नावच नव्हते, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला हाेता.