आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मासेफेक प्रकरण : आमदार नितेश राणेंसह 24 जणांची 7 हजाराच्या जामीनावर मुक्तता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंधुदुर्ग - सहायक मत्स्य अायुक्ताच्या अंगावर मासे फेकल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले कांॅग्रेसचे अामदार नितेश राणे व त्यांच्या २४ कार्यकर्त्यांना मंगळवारी अटक करण्यात अाली. मात्र कुडाळ सत्र न्यायालयाने सात हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची लगेचच सुटकाही केली.  
 
मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत जाब विचारण्यासाठी राणे व त्यांचे समर्थक ६ जुलै राेजी मालवण येथील मत्स्य अायुक्तालयात गेले हाेते. या वेळी   मच्छीमारांनी थेट सहायक अायुक्त प्रदीप वस्त यांच्या टेबलवर माशांची टाेपली अाेतली हाेती. तर अामदार राणे यांनी सहायक अायुक्तांच्या अंगावरच मासे फेकले हाेते.
 
या प्रकरणी अायुक्तांच्या तक्रारीवरून मालवण पाेलिसांनी राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांविराेधात गुन्हा दाखल केला हाेता. तत्पूर्वी, अनधिकृत पर्ससीन ट्रॉलर्सवर कारवाई केली जाईल. अवैधरीत्या मासेमारी करणाऱ्या नौकांचा परवाना रद्द केला जाईल, असे लेखी आश्वासन वस्त यांनी त्यावेळी दिल्यानंतर राणे यांनी अांदाेलन मागे घेतले हाेते. 
बातम्या आणखी आहेत...