आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंना ‘गझनी’ची उपमा देत नितेश राणेंनी उडवली खिल्ली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपसाेबत सत्तेत राहूनही कधी सत्तेच्या साेयीची तर कधी विराेधाची भूमिका घेणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी एका व्यंगचित्राद्वारे खिल्ली उडवली अाहे. या व्यंगचित्रातून त्यांनी ठाकरेंची तुलना ‘गझनी’ या चित्रपटातील पात्राशी करून शिवसेनेला डिवचले अाहे.
 
सरकारला अाक्रमक इशारा देणाऱ्या व सत्तेत राहण्यासाठी पुन्हा भाजपशी जुळवून घेणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाेंद घेण्याची उपहासात्मक मागणीही राणे यांनी काही दिवसांपूर्वी केली हाेती.
बातम्या आणखी आहेत...