आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NItesh Rane Calls Shiv 'Vada Pav' Scheme An 'extortion Racket'

'शिव वडा पाव' मध्ये 90 टक्के स्टॉल उत्तर भारतीयांचे, नितेश राणे यांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - प्रतिकात्मक) - Divya Marathi
(फोटो - प्रतिकात्मक)
मुंबई - शिवसेनेची शिव वडा पावची योजना ही प्रत्यक्ष खंडणीचे रॅकेट असून यातील 90 टक्के स्टॉल हे उत्तर भारतीयांचे असल्याचा आरोप स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून त्यांनी शिव वडा पावच्या एका स्टॉलवर स्टिंग केले. त्यावेळी याबाबतची खरी माहिती समोर आहे. सर्व नियम पायदळी तुडवत हे स्टॉल चालवले जात असल्याचे राणे म्हणाले. या स्टींगमध्ये जी माहिती मिळाली त्यानुसार, हा स्टॉल सुरू करणाऱ्याला आधी दीड लाख रुपये गुंतवावे लागतात. त्यानंतरही जो स्टॉल चालवत असेल त्याला फूटपाथवर स्टॉल चालवता यावा म्हणून महापालिकेलाही हजारो रुपये द्यावे लागतात, असा आरोप राणेंनी केला.
मराठी माणूस कुठे गेला?
शिव वडा पाव चालवणा-यांमध्ये 90 टक्के हे उत्तर भारतीय असल्याचे सांगतही नितेश राणेंनी टीकेची झोड उडवली. हे स्टॉल चालवणा-यांमध्ये किती मराठी आहेत, याचे स्पष्टीकरण शिवसेना आणि महानगरपालिकेने द्यावे असे आव्हानही नितेश राणेंनी दिले आहे. ही योजना सुरू करताना मराठी माणसाला या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाईल असे सांगितले जात होते. पण या माध्यमातून मराठी माणसाबरोबर विश्वासघात जाल्याचे ते म्हणाले.
चायनीजची विक्री
काही वडा पावच्या स्टॉलवर तर चायनीजची विक्री केली जात असल्याचा आरोपही नितेश राणे यांनी केला. या संदर्भात जेव्हा आरटीआय दाखल केली त्यावेळी ही योजना कायदेशीर नसल्याने माहिती नसल्याचे सांगण्यात आले. मग या लोकांना रस्त्यावर स्टॉल चालवण्याची परवानगी कोणी दिली आणि त्यांच्याकडून दंड कोणत्या अधिकाराने उकळला जातो असा सवाल राणेंनी केला.