मुंबई- मराठी व अमराठीच्या वादात आता ठाकरे कुटुंबियाबरोबरच आता काँग्रेसही पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचा नुकताच आमदार झालेला मुलगा नितेश राणे याने गुजराती विरूद्ध मराठी या मुद्याला हवा देत टि्वटरवर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. नितेश राणे याने पंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचा आधार घेत महाराष्ट्रातील गुजरातींवर हल्लाबोल केला आहे. नितेश याने टि्वट केले आहे की, मी स्वच्छ भारत अभियानात भाग घेऊ इच्छितो व याची सुरुवात मला मुंबईतून करावीशी वाटते. साफसफाईची सुरुवात मी मराठी माणसांचा द्वेष करणा-या गुजरातींची कायमची करू इच्छित आहे.
नितेशने पुढे म्हटले आहे की, आता काय करावे मोदी जी, तुम्हीच सल्ला द्या. महाराष्ट्रातून कमवलेल्या पैशासोबत गुजरातींना तिकडे पाठवूया आणि विचारू या की कमव आता पैसे? एका गुजराती बिल्डराकडून समजले की गुजरातमध्ये एक पेंटा हाऊस 27 लाखात येतो जो मुंबईत कोट्यावधीचा असतो. तेव्हा आम्ही कोणत्या मोदीमेनियाची चर्चा करत असतो. आश्यर्च याचेच वाटते की पांढरपेशे गुज्जू कधीच कोणाच्या निशाण्यावर आले नाहीत ज्यांची मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर मजबूत पकड आहे.
नितेश राणे यांनी यापूर्वीही मुंबईत राहत असलेल्या गुजरातींविरूद्ध आवाज उठविला होता. लोकसभा निवडणुकीआधी नितेश याने टि्वट केले होते की, "वेज स्काय, वेज हॉस्पिटल, वेज हाउसिंग सोसायटी और जल्द ही वेज मुंबई. जर गुज्जू परत गेले नाही तर ते मुंबईलाच गुजरात बनवतील तेव्हा, सावधान. मुंबईत 12 टक्के गुज्जू मराठींच्या पुढे पिल्ल्याच्या समान आहेत"
नुकत्याच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यामुळे नितेश राणे गुजराती विरूद्ध मराठी या मुद्याला हवा देत राजकारणात प्रसिद्धी मिळवू पाहत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, आमदार नितेश राणे यांनी केलेले 'ट्विट'