आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे नाव गिनीज बुकात झळकण्यासाठी नितेश राणेंनी लिहिले पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नारायण राणे यांच्या आमदार पुत्राला आता शिवसेना कसे प्रत्युत्तर देते, हे पाहाणेही औत्सूक्याचे ठरणार आहे. - Divya Marathi
नारायण राणे यांच्या आमदार पुत्राला आता शिवसेना कसे प्रत्युत्तर देते, हे पाहाणेही औत्सूक्याचे ठरणार आहे.
मुंबई - होय! तुम्ही जे वाचले ते अगदी खरे आहे. जागतिक विक्रमांची नोंद घेणाऱ्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये शिवसेनेचा समावेश करावा असे पत्र खुद्द सेनेचे कट्टर विरोधक आमदार नितेश नारायणराव राणे यांनी लिहिले आहे. हे राणे कुटुंबाचे शिवसेनेबद्दलचे प्रेम आहे, असे तुम्ही समजत असाल तर थोडे थांबा... तसे काहीही नाही. 'जगात सर्वाधिक वेळा सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी देणारा पक्ष' म्हणून शिवसेनेची गिनीज बुकात नोंद व्हावी यासाठी नारायण राणे यांचे आमदार पुत्र नितेश यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला पत्र लिहिले आहे. याआधी सर्वाधिक निवडणुका हारणारा नेता म्हणून राहुल गांधी यांची 'गिनीज'मध्ये नोंद घेण्याची मागणी एका उत्तर भारतीय नेत्याने केली होती.
 
काय म्हटले पत्रात... 
नितेश राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवताना म्हटले आहे, की महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी 'शिवसेना सरकारचा पाठिंबा काढून घेईल' हे वाक्य सर्वाधिकवेळा उच्चारले आहे. त्यासाठी या अर्जाद्वारे आम्ही त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदवण्याची विनंती करतो. अशा प्रकारचा हा जगातील एकमेव विक्रम असेल. या अर्जालाच नोंदणीसाठीचा अर्ज समजण्यात यावे. 
 
शिवसेना आणि भाजप यांच्यातील 'प्रेम' लपून राहिलेले नाही. 'तुझे-माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना' अशीच या दोन्ही पक्षांची सध्याची स्थिती आहे. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात सत्तेत असूनही शिवसेना कायम विरोधीपक्षाच्याच भूमिकेत राहिलेली आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा केंद्रातील विषय, शिवसनेने कधीही विनाअट सरकारला पाठिंबा दिलेला नाही. मुंबईसह राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये तर दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात हाडवैरी असल्यासारखे उभे ठाकले होते. 
 
राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप सत्तेत आल्यापासून शिवसेनेने वेगळी वाट धरलेली आहे. सत्तेत असुनही शिवसेनेने विरोधकांपेक्षाही अधिक विरोध सरकारला प्रत्येक वेळी केलेला आहे.त्यासोबतच पाठिंबा काढून घेण्याची धमकीही ठरलेलीच आहे. मात्र सत्ता सोडायला शिवसेना तयार नाही, हेही तितकेच सत्य आहे. त्यामुळेच या विळ्या-भोपळ्याच्या युतीला लक्ष्य करत काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. तिही मुंबई किंवा महाराष्ट्रापुरती नाही तर, जगाच्या पाठीवर पाठिंबा काढून घेण्याची इतक्यावेळा धमकी देणार दुसरा पक्ष नसल्याचा दावा नितेश यांनी केला आहे. शिवसेना पाठिंबा काढण्याची फक्त धमकी देते, त्यांच्यात पाठिंबा काढण्याची हिंमत नसल्याचेच एक प्रकारे राणे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, नारायण राणे यांच्या आमदार पुत्राला आता शिवसेना कसे प्रत्युत्तर देते, हे पाहाणेही औत्सूक्याचे ठरणार आहे.
बातम्या आणखी आहेत...