Home »Maharashtra »Mumbai» Nitesh Rane On Legislative Council Election Congress Say We Take Action

नितेश राणेंवर कारवाईचे काँग्रेसचे संकेत; ‘आदर्श’ नेते काय कारवाई करणार? नितेश यांचे वक्तव्य

दिव्य मराठी वेब टीम | Dec 07, 2017, 17:05 PM IST

मुंबई- 'मी नारायण राणेंचा कार्यकर्ता आहे. त्यांचा स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आहे. त्यामुळे माझे मत कोणाला गेले हे वेगळे सांगायला नको, ते जगजाहीर आहे.’ असे वक्तव्य काँग्रेस आमदार नितेश राणेंनी केले आहे. विधानपरिषद निवडणुकीवेळी नितेश राणेंनी भाजप उमेदवार प्रसाद लाड यांना मतदान केल्याची चर्चा असतानाच त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

...तर अनेकांचे वस्त्रहरण

'नारायण राणेंनी निवडणूक लढवली नाही हेच चांगले झाले. नाहीतर आज अनेकांचे वस्त्रहरण झाले असते. राणेंना फक्त 8-9 मते अधिक हवी होती. आमच्याकडे 25 मते अधिक होती. राजन तेली चौथा उमेदवार असूनही राणेंनी त्याला निवडून आणले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी 8-9 मते आणणे अवघड नव्हते.’ असे ते म्हणाले.

कारवाईबाबत म्हणाले

काँग्रेसकडून कारवाई होण्याची शक्यता आहे. याबाबत ते म्हणाले की, ‘कारवाई करण्याची हिंमत तर करू देत, एवढे ‘आदर्श’ नेते असताना काय कारवाई करणार? महाराष्ट्राला चांगले विरोधी पक्षनेते लाभले आहेत. कमी बोलतात, पाहिजे तेवढेच बोलतात.’

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

Next Article

Recommended