आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितेश राणेंकडून काँग्रेस कार्यालय तोडफोडीचे समर्थन; म्हणाले, मनसेचे काय चुकले?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी मनसेच्या तोडफोडीचे समर्थन करत पक्षाला घराचा आहेर दिला आहे. मनसेविरुद्ध बांगड्या दाखवणे हा महिलांचा अपमान नाही का? त्यामुळे मनसेचे काय चुकले? असा सवाल करत बदल्याची भाषा करणारी मुंबई काँग्रेस महात्मा गांधींचा अहिंसेचा विचार विसरल्याचे दिसत असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. 

 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) भागातील आझाद मैदानाजवळ असलेल्या मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयात घुसून मनसे कार्यकर्त्यांनी आज (शुक्रवार) तोडफोड केली. कार्यालयातील काचा, फर्निचर, खुर्च्या, टेबलाची नासधूस केली. तसेच तेथील काही कर्मचार्‍यांनाही मारहाण केली. याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह 7 ते 8 मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

दरम्यान, हल्लानंतर मनसेने याची चार तासांनी जबाबदारी स्विकारली. 'होय, हा हल्ला आम्ही केला आहे. मनसेने काँग्रेसवर केलेला हा 'सर्जिकल स्ट्राईक' आहे. 'ईट का जवाब पत्थर से देंगे' असे ट्‍वीट करत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले. 

 

काय म्हणाले अशोक चव्हाण?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कार्यालयावर झालेला हल्ला निषेध केला आहे. चव्हाण आज कोल्हापुरात आहेत. ते म्हणाले की, पोलिसांनी याप्रकरणी कठोर कारवाई करावी, नुकसान भरपाई मनसेने द्यावी.

 

प्रत्येकाची वैचारिक भूमिका असते. संजय निरुपम यांनी फेरीवाल्याबाबत भूमिका घेतली आहे. तशी मनसेचीही भूमिका आहे. मात्र ही भूमिका वैचारीक असायला हवी, हिंसक असू नये, असे प्रकार लोकशाहीला मारक ठरत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

 

दुसरीकडे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम हे काँग्रेसच्या प्रचारासाठी गुजरातमध्ये असून, या हल्ल्याची माहिती मिळताच, करारा जवाब मिलेगा अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडीचे फोटो...

 

हेही वाचा, 

मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसचे कार्यालय फोडले; संदीप देशपांडेंसह आठ जणांना अटक

बातम्या आणखी आहेत...