आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार्‍यांनी सपाच्या महिला कार्यकर्त्यांशी संपर्क करा; नितेश राणेंचे वादग्रस्त वक्तव्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बलात्कारावरून वादग्रस्त वक्तव्य करून स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी खळबळ उडवून दिली आहे. 'सगळ्या बलात्काऱ्यांनी कृपया समाजवादी पक्षाच्या महिला कार्यकर्त्या आणि त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क करावा, हिरवा कंदील मिळाला आहे, एन्जॉय!'

नितेश राणे यांनी शुक्रवारी (11एप्रिल) अशाप्रकारचे 'ट्विट' कले होते. मात्र, राणेंनी केलेल्या 'ट्विट'वर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर त्यांनी हे 'ट्विट' डिलीटही केले आहे. यापूर्वी समाजवादी पक्षाचे सुप्रीमो मुलायमसिंह यादव आणि नेता अबू आझमी यांनी बलात्कारावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता त्यानंतर राज्याचे मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी वाचाळ वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

दरम्यान, बलात्काराप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून नेत्यांनी वाचाळ भाषणबाजी सुरु केली आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंह यादव यांनी अशाच प्रकारच बेताल वक्तव्य केले होते. शक्ती मिल बलात्कारप्रकरणी आरोपींना ठोठावलेल्या फाशीला विरोध केला होता. मुलायम सिंह म्हणाले होते, की तरुणांकडून चूका होतच असते. बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा ठोठावणे, अयोग्य आहे. गेल्या 10 एप्रिलला मुरादाबाद येथे मुलायम सिंह यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, नितेश राणे यांनी केलेले वाचाळ 'ट्‍विट'