आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितेश राणे सर्मथक, शिवसैनिकांत राडा; कामगार संघटनेवरून मुंबईत हाणामारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शिवसेनेची कामगार संघटना मोडून काढण्याचा निर्धार उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र व स्वाभिमानी संघटनेचे नेते नितेश राणे यांनी केला आहे. तर शिवसैनिकही त्याला संधी मिळेल तेथे प्रत्युत्तर देत आहेत. वरळी येथील पंचतारांकित फोर सीझन हॉटेलमधील युनियनवरून गुरुवारी शिवसेना आणि स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली. दोन्ही गटांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोर सीझन हॉटेलमध्ये स्वाभिमानी संघटनेने युनियन स्थापण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी नितेश राणे गुरुवारी प्रबंधकांशी चर्चा करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. मात्र त्याचवेळेस शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणे यांची गाडी रोखून धरली आणि घोषणाबाजी सुरू केली. नितेश राणे यांच्याबरोबरही कार्यकर्त्यांची मोठी फौज असल्याने दोन्ही गटांत हाणामारी सुरू झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार केला. पोलिसांनी दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांना अटक केली.
नितेश राणे यांनी या प्रकरणाबाबत बोलताना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जोरदार टीका केली आहे. ‘नेतृत्व चांगले नसल्याने भारतीय कामगार संघटना लुळी-पांगळी झाली आहे. कामगारांचे प्रश्न त्यांनी सोडवले असते तर असे झाले नसते,’ असा टोलाही त्यांनी ठाकरेंना लगावला आहे.

राड्याचा इतिहास
काही वर्षांपूर्वी वरळी येथे नितेश राणे यांच्या गाडीला आदित्य ठाकरे यांच्या गाडीने ओव्हरटेक केल्याने नितेश राणे यांनी रस्त्यावरच गोंधळ घातला होता.
शिवसेनेने मुंबईत सुरू केलेल्या शिव वड्याला उत्तर देण्याकरिता छत्रपती वडा पावच्या गाड्या सुरू केल्या. त्या वेळीही दोन्ही गटांत प्रचंड हाणामारी, तोडफोड झाली होती.
शिवसेनेच्या चित्रपट शाखेप्रमाणे शाखा न काढता नितेश राणे यांनी मराठी नाटक आणि चित्रपट निर्मिती सुरू केली.