आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitesh Rane\'s News Over Marathi Menucards In Mumbai\'s Hotels

\'स्वाभिमान\'च्या लढ्याला यश, मॅकडोनाल्डमध्येही मराठीत मेन्यू कार्ड!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महाराष्ट्रात खाद्य पदार्थांचा व्यवसाय करीत असतानाही मराठीत मेन्यू कार्ड न देता इंग्रजीत मेन्यू कार्ड देणा-या विदेशी खाद्य पदार्थांच्या दुकानांना स्वाभिमानने आपला दणका दाखवण्यास सुरुवात केली आहे. लिटिल इटाली रेस्टॉरंटने मराठीत मेन्यू कार्ड दिल्यानंतर आता मॅकडोनाल्डसनेही राज्यातील सर्व आऊटलेटमध्ये 15 दिवसात मराठीत मेन्यू कार्ड देऊ असे आश्वासन स्वाभिमान संघटनेला दिल्याची माहिती अध्यक्ष व आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
राज्यभरात मॅकडोनल्डस, बर्गर किंग, केएफसी, डॉमिनोज पिज्जा यांचे अनेक आउटलेट्स आहेत. या ठिकाणी मराठी माणूस आपल्या कुटुंबासह मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ खाण्यास जातो. मात्र तेथील मेन्यू कार्ड मराठीत नसल्याने काय मागवावे हे त्याला समजत नाही. इंग्रजी न येणा-यालाही खाद्य पदार्थांची माहिती मराठीत हवी यासाठी स्वाभिमानीने आंदोलन सुरु केले आहे. मुंबई, पुणे, लोणावळा, खंडाळा येथील अशा हॉटेल्सना एक निवेदन देऊन मराठीत मेन्यू कार्ड तयार करण्यास सांगितले आहे. मुंबईतील प्रख्यात लिटिल इटाली हॉटेलने लगेचच स्वाभिमानच्या मागणीला मान देऊन आपले मेन्यू कार्ड मराठीत तयार केले. आता मॅकडोनाल्डनेही मराठीत मेन्यू कार्ड देऊ असे आश्वासन नितेश राणे यांना दिले आहे.
पुढे आणखी वाचा व पाहा...