आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीन अागेच्या न्यायासाठी राज्यभर अांदाेलन छेडणार; भालचंद्र मुणगेकर यांचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नितीन अागे हत्या प्रकरणात राज्य सरकारने चालवलेला खटला अत्यंत शरमेचा अाहे. जातीय राेषातून नितीन अागेची हत्या हाेऊनदेखील हा खटला अॅट्राॅसिटी कायद्यानुसार चालवण्यात अाला नाही. काेपर्डी घटनसारखी तत्परता सरकारने या प्रकरणात दाखवली नसून यातून राज्याची दांभिकता उघड हाेत अाहे. या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात करण्याबराेबरच अागे कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत राज्यभरात तीव्र अांदाेलन छेडण्याचा इशारा माजी खासदार व माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी दिला. 


अागे हत्याप्रकरणी चर्चगेटच्या सरकारी विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी डाॅ. बाबासाहेब अांबेडकर संघर्ष समिती स्थापन केली अाहे. नितीनची हत्या करणाऱ्या अाराेपींना शिक्षा व्हावी या मागणीबराेबरच त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष समितीने अाझाद मैदानावर बेमुदत धरणे अांदाेलन पुकारले अाहे. डाॅ. भालचंद्र मुणगेकर हेदेखील या अांदाेलनात सहभागी झाले अाहेत. या वेळी ते म्हणाले, काेपर्डी प्रकरणातील अाराेपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर राज्यभर जल्लाेष व्यक्त करण्यात अाला. परंतु नितीन अागेची हत्या करणारे अाराेपी पुराव्याअभावी निर्दाेष सुटले. त्या वेळी एकही माेर्चा निघाला नाही, ही महाराष्ट्राची दांभिकता अाहे. अॅट्राॅसिटी कायद्यानुसार गुन्हेगारांवर कारवाई करण्याची राज्य सरकारची इच्छा नाही. काेपर्डीला एक न्याय अाणि नितीन अागे दलित हत्येला दुसरा न्याय ही भूमिका खपवून घेणार नाही. या प्रकरणाची २०१६ च्या सुधारित अॅट्राॅसिटी कायद्यांतर्गत सुनावणी करावी तसेच आगे कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी एक जानेवारी २०१८ पासून राज्यभरात भव्य आंदोलन उभारणार असल्याचा इशाराही मुणगेकरांनी सरकारला दिला. येत्या ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनाला आगे कुटुंबीयांच्या न्यायासाठी राजगृह ते चैत्यभूमी असा लाँग मार्च काढणार असल्याचे मुणगेकरांनी सांगितले.  

बातम्या आणखी आहेत...