आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Gadkari Backs Devendra Fadnavis On PM led Panel For Mumbai

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय : नितीन गडकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून जे मिळाले नाही ते येत्या दोन वर्षांत महाराष्ट्राला देणार, असे आश्वासन केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिले आहे. येत्या दोन वर्षांत मुंबई आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे, हे सांगतानाच गडकरींनी मुंबईच्या विकासासाठी विशेष समिती नेमण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देत अप्रत्यक्षपणे शरद पवारांच्या भूमिकेला विरोध केला आहे.

मुंबईच्या विकासासाठी विशेष समिती नेमण्याबाबत पंतप्रधानांनी घेतलेल्या मुख्यमंत्री परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या भूमिकेचेही गडकरींनी स्वागत केले. किंबहुना मुंबईशी संबंधित अनेक असे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांमध्ये केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची ठरत असते. तसेच मुंबईबाबतचे काही प्रश्न तर केंद्र सरकारच्या अनेक खात्यांशी निगडित असतात, ज्यामधून पंतप्रधान मार्ग काढू शकतात. त्यामुळे पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मुंबईसाठी विशेष समितीसाठी असेल तर ती गरजेची आहे, अशा शब्दांत गडकरींनी या समितीची गरज अधोरेखित करत फडणवीसांच्या प्रस्तावाचे समर्थन केले.