आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Gadkari Can Become Cabinet Minister In Narendra Modi Government

B\'Day Special: मोदींच्या या मराठी मंत्र्याने केला होता रस्त्यांचा कायापालट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपचे राज्यातील प्रमुख नेते आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांना नरेन्द्र मोदींच्या सरकारमध्ये रस्ते व परिवहन मंत्रीपद मिळाले आहे. वाढदिवसाच्या एक दिवस आधीच मोदींना मिळालेली एक मोठी भेट ठरणार आहे. पण मोदींसाठी हे खाते तसे नवीन नाही. त्याचे कारण म्हणजे 1995 मध्ये महाराष्ट्रमध्ये युती सरकारच्या काळात गडकरींनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्रीपद सांभाळलेले आहे. या कार्यकाळात त्यांनी बरेच यश मिळवले होते. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेसारखे अनेक मोठे प्रोजेक्टस् त्यांच्या कार्यकाळात तयार झाले होते.

नागपूरच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये नितिन गडकरी यांचा जन्म झाला. तरुणपणीच ते भाजयुमो मध्ये सहभागी झाले होते. नागपूरचे महापौरपद मिळवल्यानंतर त्यांनी राज्याच्या राजकारणात प्रवेश मिळवला. 1989 मध्ये ते पदवीधर मतदारसंघातून निवडून आले. सलग पाच वेळा ते आमदार बनले. पण कधीही निवडणूक लढवली नाही.
1995 मध्ये गडकरी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले. त्यानंतर वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. मुंबई - पुणे एक्सप्रेस हायवे हाही त्यापैकीच एक निर्णय होता. 2010 मध्ये त्यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. पण दुसरी टर्म सुरू होण्याआधीच त्यांच्यावर आपल्या कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. पण आयकर विभागाने नंतर त्यांना या प्रकरणी क्लीनचीट दिली.

पुढील स्लाईड्सवर पाहा, गडकरींनी केलेली विकास कामे..