आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत ‘बुर्ज’पेक्षाही उंच इमारत उभारणार, नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाची आर्थिक राजधानी मुंबईत दुबईच्या बुर्ज खलिफापेक्षाही ऊंच आणि तेवढीच आकर्षक, भव्य इमारत उभारली जाईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये १६३ मजली बुर्ज खलिफापेक्षाही उंच इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबईच्या मरीन ड्राइव्हपेक्षाही अधिक शानदार व मोठ्या रस्त्याचा समावेश आहे.
 
गडकरींना मुंबई पोर्ट ट्रस्टकडे पडून असलेल्या औद्योगिक जमिनीचा नव्या ईस्टर्न वॉटरफ्रंट योजनेंतर्गत चेहरामोहरा बदलायचा आहे. गडकरी म्हणाले, मुंबईत आमच्याकडे सर्वात जास्त जमीन आहे. बंदराच्या जवळील जमिनीला विकसित करण्याच्या अनेक योजना आहेत. त्या तयार असून आता फक्त केंद्र सरकारच्या हिरव्या झेंडीची प्रतीक्षा आहे. त्यानुसार एक ग्रीन आणि स्मार्ट राेड तयार केला जाईल, तो सध्याच्या मरीन ड्राइव्हपेक्षा तीन पट मोठा असेल. माझगाव डॉक आणि वडाळ्यादरम्यान ७ किमीचा मरीन ड्राइव्ह प्रमुख आकर्षण असेल.
 
लंडनचे प्रमुख पर्यटन आकर्षण ‘लंडन आय’च्या धर्तीवर मुंबई वॉटरफ्रंट उभारले जाईल. त्या जागतिक स्तरावरील सुविधा उपलब्ध असतील. तसेच बुर्ज खलिफापेक्षाही मोठी इमारत उभारली जाईल. जलवाहतुकीसाठी येथे क्रुझ टर्मिनल, ५०० खोल्यांचे तरंगते हॉटेल  आणि तीन-चार तरंगते रेस्तराँदेखील असतील. तसेच एक संग्रहालयही उभारले जाईल. मेरिना आणि जेट्टीचीही उभारणी केली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...