आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nitin Gadkari Meet Pm Modi, After Meeting Gadkari Towords To Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता: महायुती टिकविण्यासाठी मोदींचा नितीन गडकरींना \'संदेश\'!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शिवसेनेने 'मिशन 150+' ठेवल्याने तसूभरही मागे हटणार नाही याचे स्पष्ट संकेत दिल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याची दखल घेतली आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील सद्य स्थितीवर सविस्तर चर्चा केली. यावेळी मोदींनी गडकरी व प्रदेश भाजपला मोलाचा सल्ला दिला असून, ही महायुती टिकली पाहिजे असे सांगितले आहे. मोदींचा हाच निरोप घेऊन नितीन गडकरी आज दुपारी दिल्लीहून मुंबईकडे रवाना होणार होते मात्र, प्रकृती अस्वस्थामुळे ते आज उशिरा मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.
शिवसेना भाजपला 120 पेक्षा जास्त एकही जागा देणार नसेल तरीही चालेल पण युती तुटू नये अशी आपली इच्छा असल्याचे मोदींनी गडकरींना सांगितले आहे. मोदींचा हाच निरोप घेऊन नितीन गडकरी आज दुपारी दिल्लीहून मुंबईकडे रवाना होणार होते. दुसरीकडे, प्रदेश भाजप कोअर कमिटीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीला निवडणूक प्रभारी ओ पी माथूर, राजीव प्रताप रूडी, फडणवीस, तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगुंटीवर, एकनाथ खडसे आदी सर्व नेते उपस्थित होते. याबाबतची माहिती देण्यासाठी भाजपने 4 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. अमित शहा मुंबईत आहेत मात्र ते खासगी कार्यक्रमात व्यस्त आहेत.
भाजप-शिवसेना युती जवळपास संपुष्टात आल्याचे बातम्या पसरवूनसुद्धा शिवसेना आपल्या म्हणण्यावर ठाम आहे. भाजपने कथित 12 तासांचा अल्टिमेटम दिल्यानंतरही आम्ही जुमानत नसल्याचे सेनेने ठणकावून भाजपला सांगितले आहे. याची दखल दिल्ली पातळीवर भाजपने घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील बडे नेते नितीन गडकरींना बोलावून राज्यातील सद्य राजकीय स्थितीची माहिती घेतली. शिवसेना 150 पेक्षा एकही कमी जागा लढणार नसल्याचे गडकरींनी मोदींना माहिती दिली. यावर मोदींनी शिवसेना त्यांच्या जागेवर बरोबर आहे. आपण काय निर्णय घ्यायचा ते ठरवा असे सांगितल्याचे कळते.
भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीत 117 जागा लढविल्या होत्या तर आता मित्रपक्ष वाढूनही आपल्याला 120 जागा मिळत असतील तर याबाबत सकारात्मक विचार करावा. शिवसेना आपला सर्वाधिक जुना मित्र पक्ष आहे. 25 वर्षापासूनची असलेली युती माझ्या काळात तुटायला नको. महाराष्ट्रात चुकीचा संदेश जाईल. याचा फटका आता विधानसभेलाही बसेल तसेच याचे राज्यातील राजकारणावर दूरगामी परिणाम होतील. तुम्ही मुंबईला जाऊन पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे व तोडगा काढावा असा निरोप मोदींनी गडकरींना दिल्याचे दिल्लीतील आमच्या सूत्रांनी सांगितले आहे.
दुसरीकडे, अमित शहा व प्रदेश भाजप नेते 130 पेक्षा जागा कमी घ्यायला नकार देत आहेत. प्रसंगी स्वबळावर लढू. हीच आपली ताकद ओळखण्याची नामी संधी आहे असे प्रदेश नेत्यांचे म्हणणे आहे. अमित शहा व भाजपच्या नेत्यांनी आखलेल्या रणनितीनुसार, शिवसेनेवर शेवटपर्यंत प्रेशर टाकायचे. जागावाटपाचा तिढा सुटला नाही तर 21 तारखेला आपल्या 117 जागांंच्या कोट्यातील किमान 60-70 जागांवरील उमेदवार जाहीर करायचे. त्यानंतर आपल्या कोट्यातील दुसरी उमेदवारी जाहीर करायची व सेनेवर दबाव टाकायचा. 25 तारखेपर्यंत शिवसेना मागे सरकली तर ठीक नाही तर मोदी सांगतील त्यानुसार 120 जागा लढवायच्या अन्यथा स्वबळावर लढायचे याचा निर्णय घ्यायचा अशी रणनिती आखली आहे.
पुढे वाचा, भाजपची चाणक्यनिती शिवसेनेपुढे चालणार नाही- उद्धव ठाकरे