आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भले न करणाऱ्यांना सत्ता गेल्यानंतर जात आठवते, नितीन गडकरींचे टीकास्त्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘सत्ता असताना कधीही जातीचे भले करणाऱ्या काही नेत्यांना सत्ता गेल्यानंतर मात्र जात आठवते. मात्र यासंदर्भात भाजपची भूमिका स्पष्ट असून गरीब माणूस केंद्रबिंदू मानून विषमतामुक्त समृद्ध देश आम्हाला निर्माण करायचा आहे. यामुळे कोणाला आरक्षण मागण्याची वेळ येणार नाही,’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा गुरुवारी समारोप झाला त्या वेळी गडकरींनी ही भूमिका मांडली.

‘काही नेत्यांना केवळ सत्तेसाठी स्वत:च्या लाभासाठी जातीचा पाठिंबा हवा असतो. यंदा दीनदयाळ उपाध्याय यांचे जन्मशताब्दी वर्ष हे गरीब कल्याण वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. गरीब हा केवळ गरीब असतो, याला कोणतीही जात नसते. उपाध्याय यांच्या विचारांनुसार गरीब हा आमचा केंद्रबिंदू आहे. रोजगाराची निर्मिती करणारे आिर्थक धोरण हे आपले वैशिष्ट्य आहे. एक असा सुखी-संपन्न देश बनवण्याचा संकल्प भाजपने केला असून जेथे कोणालाही आरक्षण मागण्याची वेळ येणार नाही.’

राज्य सरकारला ३१ ऑटोबरला दोन वर्षे पूर्ण होत असून सरकारची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप राज्यात विशेष मोहीम चालवणार आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राच्या प्रभारी डॉ. सरोज पांडे यांनीही कार्यकारिणीत आपले विचार मांडले.

लाड उपाध्यक्ष, कुटे सरचिटणीस
भाजपच्या कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी प्रसाद लाड यांची िनवड करण्यात आली. तसेच विदर्भातील आमदार संजय कुटे यांच्याकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...