आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Sardesai Said, Ministers Should Resign For Fair Inquiry

निष्पक्ष चाैकशीसाठी मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, मनसेचे सरदेसाई यांची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जोपर्यंत विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्यावरील आरोपांमागील सत्य उजेडात येत नाही तोपर्यंत निष्पक्ष चौकशीसाठी या दोन्ही मंत्र्यांनी आपापल्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस नितीन सरदेसाई यांनी केली आहे.

‘आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना कंटाळून लोकांनी युतीच्या हाती सत्ता दिली. मात्र, या सरकारला वर्ष पूर्ण व्हायच्या आतच जनतेच्या पदरी निराशा पडत अाहे. मंत्र्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने भाजपचा ‘पार्टी विथ डिफरन्स' हा दावा तथ्यहीन अाहे,’ असा अाराेपही मनसेने केला आहे.

चौदा वर्षे सत्तेबाहेर राहिल्याने यांची भूक वाढली की काय, असा सवाल करत मनसेने मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली. चौकशीपूर्वीच मुख्यमंत्री एखाद्या मंत्र्याला क्लीन चिट कशी देऊ शकतात, असे विचारत मनसेने या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत आणि ही चौकशी पूर्ण होईपर्यंत तावडे आणि मुंडे यांनी राजीनामे देऊन चौकशीस सहकार्य करावे, अशी मागणी सरदेसाईंनी केली आहे.