आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nitin Tendulkars Sat Na Gat Song Album Launch At Mumbai

भावामुळे ‘सत ना गत’ स्पेशल; मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भावना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दादा कविता करतो याचे घरी सर्वांनाच खूप कौतुक आहे. त्याला मिळालेला हा गुण ईश्वराची देण आहे. ‘सत ना गत’ चित्रपटापासून गाण्याची सुरुवात होत असली तरी तो भविष्यात गाणी लिहीत राहील. भावाने गाणी लिहिल्याने हा चित्रपट माझ्यासाठी स्पेशल असेल, असे मत मास्टर -ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नितीनच्या चित्रपट पदार्पणप्रसंगी व्यक्त केले.

देविशा फिल्म्सच्या या चित्रपटाच्या संगीत सीडीचे प्रकाशन त्याच्या हस्ते झाले. या वेळी तो बोलत होता. लेखक राजन खान, दिग्दर्शक राजू पार्सेकर, नायिका पाखी हेगडे, गीतलेखक नितीन तेंडुलकर आणि सयाजी शिंदे उपस्थित होते.

राजन खान यांच्या गाजलेल्या ‘सत ना गत’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाद्वारे नितीन तेंडुलकर मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करत आहेत. एका शांत गावात 1992 मध्ये घडलेल्या एका क्रूर घटनेचे चित्रण आणि त्याचे पडसाद पडद्यावर दाखवण्यात दिग्दर्शक राजू पार्सेकर यशस्वी झाले आहेत.