कल्याणमध्ये शाळेत नायट्रोजन / कल्याणमध्ये शाळेत नायट्रोजन सिलिंडरचा स्फोट, 1 ठार तर 12 विद्यार्थी जखमी

Dec 24,2015 05:07:00 PM IST
ठाणे- कल्याणमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नायट्रोजन सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. कल्याण पूर्व भागात मलंगरोडवर असलेल्या आर्य गुरुकुल शाळेत आज दुपारी तीनच्या सुमारास हा स्फोट झाला आहे. सिलिंडर स्फोटात फुगे फुगविणा-या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर शाळेतील 12 विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना डोंबिवलीतील एपीईएस रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जखमी विद्यार्थ्यांपैकी काहींची प्रकृती गंभीर तर काहींची स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
आर्य गुरूकुल शाळेत दोन दिवसापासून क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. समारंभस्थळी फुगे फुगविण्यासाठी नायट्रोजन सिलिंडर गॅसची टाकी मागविण्यात आली होती असे सांगण्यात येत आहे. शाळा प्रशासनाकडून घटनेबाबत व जखमी मुलांबाबत खुलासा करण्यात आलेला नाही.
X