आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Action Stop Against On Illegal Construction Says Chief Minister Prithiviraj Chavan

बेकायदा बांधकाम विरोधातील कारवाई थांबणार नाही : मुख्यमंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ठाण्यातील बेकायदा बांधकाम तोडण्याच्या कारवाईला स्थगिती देणार नसल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधानसभेत स्पष्ट केले. यापैकी 57 इमारती अतिधोकादायक असून त्या तशाच ठेवल्या तर मुंब्य्रासारखी घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. या इमारतींमधील नागरिकांची एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील घरांमध्ये पर्यायी व्यवस्था केली जाऊ शकते, असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, सुभाष देसाई यांनी या कारवाईबाबत लक्षवेधीद्वारे चर्चा उपस्थित केली होती. मुख्यमंत्री म्हणाले की, ठाण्यात 1100 इमारती धोकादायक तर 57 अतिधोकादायक आहेत. अतिधोकादायक इमारती सोडू नका, असे रहिवाश्यांना सांगणे अयोग्य आहे. त्यामुळे तेथील नागरिकांची तात्पुरती व्यवस्था म्हणून एमएमआरडीएची भाडेतत्त्वावरील घरे देण्याबाबत ठाणे महानगरपालिका आयुक्त व एमएमआरडीएचे आयुक्त, नगरविकास विभागाचे सचिव निर्णय घेतील.