आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गायब झालेल्या मुली कुंटणखान्यातील नाहीत : गृहमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पळालेल्या व गायब झालेल्या मुली कुंटणखान्यात सापडल्या नसल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधान परिषदेत दिली. नीलम गोर्‍हे यांनी पुण्यातून गायब मुलींचा मुद्दा उपस्थित केला होता. गोर्‍हे यांनी सांगितले की, पुणे हे मुलींच्या व्यापाराचे केंद्र झाले आहे. तसेच या मुली कुंटणखान्यात सापडल्याचेही त्यांनी सांगितले. चर्चेला उत्तर देताना पाटील यांनी सांगितले की, 35 टक्के मुली कौटुंबिक तणाव, 20 टक्के मुली प्रेमप्रकरण, 5 टक्के मुली नैराश्य, 5 टक्के मुली वेडसरपणा, 4 टक्के मुली आजारपण अशा विविध कारणांनी पळून जातात. 2012 मध्ये 627 मुलींचा शोध घेण्यात आला व त्यांची व्यवस्था करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले

महसूल विभागातील रिक्त पदे भरणार- जिल्हा महसूल विभागातील सर्व रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील, असे आश्वासन राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी विधान परिषदेत दिले. शोभाताई फडणवीस यांनी जिल्हा महसूल विभागात राज्यात चार अपर जिल्हाधिकारी, एकाहत्तर उपजिल्हाधिकारी, 81 तहसीलदार आणि 431 नायब तहसीलदार अशी एकूण 587 पदे रिकामी असल्याचे म्हटले. ही पदे रिक्त असल्याने विकास कामे मंदावल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते.

शिक्षकांच्या मागण्या लवकरच पूर्ण करणार - फौजिया खान- राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी विधान परिषदेत दिले. डॉ. अपूर्व हिरे, सतीश चव्हाण, विक्रम काळे आदींनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांचा तारांकित प्रश्न विचारला होता.