आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह; जान्हवी गडकरला जामीन नाकारला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून दोन जणांचा बळी घेणारी महिला वकील जान्हवी गडकर हिचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने शुक्रवारी फेटाळला. न्यायाधीश रिचा खेडेकर यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. दरम्यान, जान्हवीच्या न्यायालयीन कोठडीत १० जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी याप्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली.

या वेळी जान्हवीचे वकील अमित देसाई म्हणाले, या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे तिला जामीन मंजूर करण्यात यावा. यावर सरकारी वकील प्रल्हाद महाजन यांनी जान्हवीला जामीन दिल्यास ती पुरावे नष्ट करण्यासाठी साक्षीदारांवर दबाव आणू शकते. तसेच हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे तिला जामीन मंजूर करण्यात येऊ नये, असे न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने जान्हवीचा जामीन अर्ज फेटाळला. १० जून रोजी तिने मद्यधुंद अवस्थेत आपली ऑडी कार दामटून एका टॅक्सीला उडवले होते. यात दाेघांचा मृत्यू झाला हाेता तर इतर चार जण जखमी झाले हाेते.