आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नल पुरोहितला जामीन नाकारला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मालेगावमध्ये २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितचा जामीन अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने सोमवारी फेटाळला.
या बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएने मकोका हा सर्वात कडक कायदा काढून टाकल्यामुळे आता आपणाला जामीन द्यायला हवा, असे पुरोहितच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. मात्र पुरोहितविरुद्ध प्रथमदर्शनी भक्कम पुरावे आहेत, असा युक्तिवाद एनआयएने केला. २९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावात हा बॉम्बस्फोट झाला होता. या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंहसह १२ जणांना अटक झाली होती.
बातम्या आणखी आहेत...