आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्काराच्या प्रकरणामध्ये पॅरोलवर सुटका करू नका: राष्ट्रवादी युवती काँग्रेस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बलात्काराच्या प्रकरणामध्ये पॅरोलवर सुटका करू नका
राष्ट्रवादी युवती काँग्रेस करणार राज्य सरकारकडे मागणी
प्रतिनिधी । मुंबई
गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वारंवार घडत असल्याने बलात्काराच्या प्रकरणांमध्ये आरोपीला पॅरोल मिळू नये म्हणून तुरुंग नियमावलीमध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे राज्य सरकारला करण्यात येणार आहे. महिला व मुलांच्या सुरक्षेबाबतही कायद्याच्या योग्य अंमलबजावणीची मागणी या वेळी करण्यात येणार आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात बुधवारी महिलांच्या प्रश्नांवर एक बैठक झाली. या वेळी महिलांच्या सुरक्षेबाबतच्या काही सूचना शरद पवार यांनी पाटील यांना केल्या. याबाबतच्या सर्व मागण्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या व्यासपीठावरून सरकारकडे केल्या जातील, असेही राष्ट्रवादीच्या एका नेत्याने सांगितले. प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये महिला कक्ष, त्यांना प्रशिक्षण व प्राथमिक सुविधा देणे, महिला अत्याचारांच्या प्रकरणांची दैनंदिनी देखरेखीखाली नोंद करणे, महिला सरकारी वकिलांची संख्या वाढवणे आदी मागण्या आहेत.