आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Barricades On Twelth Board Examination; After Pawar's Promise Strike Cancelled

बारावीच्या परीक्षा निर्विघ्न होणार ;पवारांच्या आश्वासनामुळे कर्मचा-यांचा संप मागे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील शिक्षकेतर कर्मचा-यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप मागे घेतल्याने बारावीच्या परीक्षेवरील संकट टळले आहे. या कर्मचा-यांच्या जास्तीत जास्त मागण्या मान्य करण्यात येतील असे, आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याने संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विद्यापीठ स्तरावरील बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्धार संघटनेने केला आहे.

शिक्षकेतर कर्मचारी संघटनांबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा करून त्यांना येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हा संप मागे घेण्यात आल्याची माहिती संघाचे अध्यक्ष आर. बी. सिंह यांनी दिली. सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येत असले तरी राज्याच्या वेगवेगळ्या भागात ते वेगवेगळे आहे. हा भेद दूर करण्याचे आश्वासनही पवार यांनी दिल्याचे सिंह यांनी सांगितले.