मुंबई - केरळ राज्यापाठोपाठ दिल्लीतही मॅगीवर बंदी घातली गेल्यानंतर आता राज्यातल्या विविध शहरांतूनही मॅगी नूडल्स आणि मॅगी मसाला या ‘नेस्ले’ कंपनीच्या उत्पादनांचे नमुने गोळा करून पुण्याच्या केंद्रीय अन्न आणि अौषध तपासणी केंद्राकडे पाठवण्यात आले आहेत. शुक्रवारी या तपासण्यांचे अहवाल सरकारला मिळणार असून त्यानंतर ‘मॅगी’च्या उत्पादनावर बंदी घालायची की नाही याबाबत सरकार निर्णय घेणार अाहे. त्यामुळे सध्या तरी मॅगीला राज्य सरकारने क्लीन चिट दिलेली नाही.
बच्चे कंपनीचे आवडते खाद्य असलेल्या मॅगी समोरील संकटांची मालिका संपण्याची चिन्हे अद्यापही दिसत नाहीत. राज्य सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे आणि नाशिक या शहरांसह राज्यातील पंधरा ठिकाणांहून मॅगी नूडल्स आणि मॅगी मसाला या नेस्ले कंपनीच्या उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात आले आहेत. ‘शुक्रवारी त्याबाबतचा अहवाल अन्न आणि औषध प्रशासनाला सादर होणार असून त्यानंतर कारवाईची दिशा स्पष्ट होईल,’ अशी माहिती अन्न आणि अौषध प्रशासन आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी दिली.
जळगावातून मॅगी परत पाठविली : जळगावच्या बिग बझारमधून सुमारे दीड लाख रुपयांचे मॅगीची ३०० पाकिटे मुख्य कार्यालयाकडे परत पाठविण्यात अाली. तसेच ‘डी मार्ट’मधीलही मॅगीचा संपूर्ण माल परत करण्यात अाला अाहे. साेलापुरातील अन्न व अाैषध प्रशासनाने मुख्य वितरकाकडून मॅगी नुडल्सचा ५६० ग्रॅम वजनाचे एकच पॅकेट ताब्यात घेतले असून ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात अाले अाहे.
काय होईल कारवाई ?
> अहवालात मॅगीच्या उत्पादनांमध्ये आरोग्याच्या दृष्टीने काही घातक पदार्थ आढळल्यास तातडीचा उपाय म्हणून मॅगीच्या सध्या बाजारात असलेल्या बॅचेसवर बंदी घालण्यात येईल. त्यानंतर मॅगीच्या उत्पादनांवर संपूर्ण बंदीच्या निर्णयाबाबत विचार केला जाईल.
> अशा आरोग्याच्या दृष्टीने घातक असलेल्या पदार्थांची जाहिरात केल्याप्रकरणी सेलिब्रिटींवर कारवाई करण्याचे अधिकार अन्न आणि औषध प्रशासनाला आहेत.
दाेन तपासणीत घातक पदार्थ नाहीत : बापट
मॅगीचे महाराष्ट्रातील अाठ नमुने तपासणीसाठी अन्न व अाैषध प्रशासनाच्या पुण्यातील प्रयाेगशाळेत पाठविण्यात अाले अाहेत. त्यापैकी दाेन नमुन्याच्या तपासणीत अाराेग्यास घातक ठरतील असे काहीही पदार्थ अाढळले नाहीत. त्यामुळे सरकारच्या वतीने राज्यात या उत्पादनांवर अद्याप काेणतीही कार्यवाही करण्यात अालेली नाही. मात्र अाणखी सहा नमुन्यांचा अहवाल शुक्रवारी प्राप्त हाेणार अाहे. त्यात मॅगीत घातक ठरणारे पदार्थ अाहेत काय, याची शहानिशा केल्यानंतर उत्पादनावर बंदी घालायची की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बापट यांनी दिली.