आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Compaigsation If Divorced Was Baseless, Aurangabad Bench

विनाकारण घटस्फोट घेतला तर पोटगीचा हक्कच नाही, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काहीही कारण नसताना घटस्फोट घेऊन पोटगी मागता येणार नसल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एका प्रकरणात नुकताच दिला. न्यायमूर्ती अभय ठिपसे यांच्या खंडपीठात याप्रकरणी सुनावणी झाली. याप्रकरणी एका पतीने याचिका दाखल केली होती.
पतीचे वकील मिलिंद जोशी यांनी सांगितले, ही महिला केवळ दीड वर्षच पतीच्या घरी राहिली होती. त्यानंतर कोणतेही कारण न देता माहेरी गेली. पतीने तिला घरी परत येण्यासाठी नोटीसही पाठवली. मात्र, तिने काहीही उत्तर दिले नाही. तसेच वैवाहिक जीवनातील मूलभूत हक्क व पोटगीसाठी तिने 2006 मध्ये कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने ‘कोणत्या कारणासाठी तुम्ही पोटगी मागता?’ अशी विचारणा करत तिची याचिका फेटाळून लावली. पत्नी अजूनही घरी येण्यास तयार नसल्याचे सांगत पतीने मार्च 2009 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. त्यानंतर न्यायालयानेही दोघांचा घटस्फोट मंजूर केला. आता आपला घटस्फोट झाल्याचे सांगत तिने पुन्हा पोटगीसाठी अर्ज केला. त्यामुळे वैतागलेल्या पतीने पत्नीची उच्च न्यायालयात धाव घेत हे प्रकरण रद्द करण्याची मागणी केली. घटस्फोट मिळालेल्या पत्नीचे वकील आर. व्ही. गोरे यांनी आता दोघांचा घटस्फोट झाल्याचे सांगत महिलेला पोटगी देण्याची मागणी न्यायालयात केली.
विभक्त राहण्याचे कारण स्पष्ट नाही
पत्नी पतीपासून काहीही कारण नसताना विभक्त राहिली. दोघांना घटस्फोट देताना न्यायालयाला कायदेशीर कारण सापडले नाही. त्यामुळे पत्नीला कोणत्या आधारावर पोटगी द्यावी, असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती ठिपसे यांनी संबंधित महिलेला पोटगी देण्यास असमर्थता दर्शवली.