आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत बांधकामांबाबत तडजाेड नाही, उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई विमानतळ परिसरात असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत कुठलीही तडजोड करण्यात येणार नाही, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. याप्रकरणी न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांच्यासमोर सुनावणी झाली. एका बांधकाम व्यावसायिकाने या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालय म्हणाले, ‘विमानतळाच्या सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड करण्यात येणार नाही. त्यामुळे सर्वांनी नियमाचे पालन करावे. न्यायालयाने इमारतींच्या अनधिकृत बांधकामांबाबत निर्णय दिल्यानंतर मुंबई महापालिकेने सायली बिल्डर्सला इमारतीचे वरील तीन मजले पाडण्याचे निर्देश दिले होते. ही इमारत विमानतळाच्या संरक्षक भिंतीला लागून आहे. मात्र, तीन मजले पाडल्यास इमारतीत राहणाऱ्या लोकांना बेघर व्हावे लागेल, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. मात्र, याबाबतच्या निर्णयात बदल होणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. दरम्यान, याप्रकरणी २० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...