आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविश्वास मंजूर, तरी अायुक्त तुकाराम मुंढे यांच्या पवित्र्याने वाद वाढला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बेकायदेशीर बांधकामे, भ्रष्टाचाराविरुद्ध मोहीम उघडून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरणारे नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध सत्ताधाऱ्यांनी आणलेला अविश्वास ठराव बहुमताने पारित झाला. मुंढे यांना पाठिंबा म्हणून जनतेने आंदोलनही उभारले होते. शासनाचा आदेश आल्याशिवाय जाणार नसल्याचे आयुक्त मुंढे यांनी निक्षून सांगितल्याने हा वाद आणखी चिघळला आहे.

पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असून काँग्रेस, शिवसेना, भाजप विरोधात आहेत. लोकप्रतिनिधींना अवमानास्पद वागणूक देत असल्याचा ठपका मुंढेंवर होता. ठरावाच्या बाजूने १०४ जणांनी मतदान केले. भाजपच्या नगरसेवकांनी मुंढेंना पाठिंबा दिला.

नवी मुंबईकरांनी ‘सेव्ह तुकाराम मुंढे’ मोहीम सुरू केली होती. एकत्रित येऊन ‘वॉक फॉर आयुक्त’ हे अभियानही राबवले. मात्र महापौर सुधाकर सोनावणे यांनी आयुक्तांची हकालपट्टी झाल्याशिवाय महापालिकेत येणार नाही, असा पवित्रा घेत २० दिवस पालिकडेकडे पाठ फिरवली होती. शिवसेनेने राष्ट्रवादीला चिमटे काढत या ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने अविश्वास ठराव मंजूर होऊ शकला.

भवितव्य मुख्यमंत्र्यांच्या हाती
आयुक्त मुंढे यांच्या विरोधात पालिकेने बहुमताने अविश्वास ठराव मंजूर केला असला तरी त्याला अंतिम मान्यता देण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LIVE घटनाक्रम
- १०५ विरुद्ध ६ मंतांनी अविश्वास ठराव मंजूर
- महापौर सुधाकर सोनवणे यांनी ठराव पटलावर ठेवला होता.
- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने अविश्वास ठरावाच्या बाजुने मतदान केले, तर भाजपने त्यालाविरोध केला.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी सभागृहात मुंढे गो बॅकचे फलक झळकवले.
- महापालिकेने मुंढे यांना शासनाने परत बोलवावे असे महापौरांनी म्हटले आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे लक्ष्य लागले आहे.
काय आहे प्रकरण
- नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात नगरसेवकांनी अविश्वास ठरावाचे अस्त्र उपसले आहे.
- आज (मंगळवार) महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आणि शिवसेनेचे काही नगरसेवक एकत्र येऊन आयुक्त मुंढेंविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहेत.
- यावर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवसेनेचे नगरसेवक आणि विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी पक्षात गटतट नसल्याचे स्पष्ट केले. पालकमंत्री आणि पक्षप्रमुख जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवसेना सभागृहात काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
काय येत आहे अविश्वास ठराव
- नगरसेवकांचा आरोप आहे, की आयुक्त मुंढे महापौर, नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींचा अवमान करतात. धोरणात्मक प्रस्ताव महासभेत न आणता परस्पर निर्णय घेतले जातात.
- स्थायी समितीच्या निर्णयांवर आयुक्त मुंढे गदा आणतात.
- अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे अनिश्चित काळासाठी सुटीवर जाणार अशी चर्चा होती, मात्र मंगळवारी सकाळी ९.३० वाजता ते पालिकेत दाखल झाले आणि सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
- अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याची त्यांनी तयारी दाखविली.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...