आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेडलाइन नाही.. पण मुंबई विद्यापीठाचे निकाल लवकरच, शिक्षणमंत्री तावडेंची ग्वाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या गाेंधळाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्यपाल विद्यासागर राव अाणि शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांची बैठक झाली. या बैठकीत विद्यापीठांच्या रखडलेल्या निकालांचा अाढावा घेण्यात अाला. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांनी निकाल लागण्यात अालेल्या अडचणींवर उपाययाेजना करण्यात अाल्या असून हे निकाल अाता लवकरच लागतील, पण त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावर काेणताही परिणाम हाेणार नाही, अशी ग्वाही दिली. परंतु या निकालाची डेडलाइन काय असेल हे सांगणे टाळले. पुनर्मूल्यांकनासाठी स्वतंत्र रचना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांिगतले.  

   
मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या घाेळासंदर्भात राज्यपाल विद्यासागर राव, राज्यमंत्री रवींद्र वायकर, मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे, प्रधान सचिव, प्रभारी परीक्षा निरीक्षक यांची राजभवन येथे बैठक झाली. या बैठकीत अातापर्यंत किती पेपर तपासून झाले, किती तपासायचे बाकी, तांत्रिक अडचणी याबाबत सादरी करण करण्यात अाले. या अडचणीवर करण्यात येणाऱ्या उपाययाेजनांची माहिती राज्यपालांना देण्यात अाली. विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये यासाठी कॅट परीक्षेमार्फत जे प्रवेश दिले जातात ते कॅट मेरिटमार्फत दिले जातील. निकाल उशिरा जाहीर केला तरी चालेल. यासंदर्भात उच्च तंत्रशिक्षण अाणि तंत्रशिक्षण विभागाला निर्देश देण्यात अाल्याचे तावडे यांनी सांगितले. उरलेल्या चार टक्क्यांमुळे तपासून झालेल्या ९६ टक्के उत्तरपत्रिकांचा निकाल  जाहीर करता येईल का, याचा विचार करण्यात येत अाहे.  परीक्षा मंडळाने याबाबत निर्णय घेतला तर ९० टक्के मुलांचे निकाल जाहीर हाेऊ शकतात. कायद्याप्रमाणे परीक्षा मंडळाचा हा निर्णय असल्याने त्यांनी याबाबत विचार करणे गरजेचे अाहे, असेही ते म्हणाले.   
 
पुनर्मूल्यांकनाची प्रकरणे माेठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता लक्षात घेता पुनर्मूल्यांकनाबाबत वेगळी रचना करण्याबाबत प्रकुलगुरूंना सांगण्यात अाले अाहे. त्यासाठी स्वतंत्रपणे एजन्सी स्थापन करून पुनर्मूल्यांकन वेळेत पूर्ण करून घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. निकालाबाबत निर्माण झालेल्या अडथळ्यांवर उपाययाेजना करण्यात अाल्या असल्याने अाता निकाल लवकर लागतील, अशी अपेक्षा शिक्षणमंत्र्यांनी व्यक्त केली.   

निकाल लागल्यानंतर दोषींवर कारवाई   
मुंबई विद्यापीठाच्या निकालासाठी आधी ३१ जुलै, मग ५ऑगस्ट आणि त्यानंतर १५ ऑगस्ट अशा डेडलाइन्स दिल्या होत्या. मात्र, या तिन्ही डेडलाइन्स मुंबई विद्यापीठाकडून पाळल्या गेल्या नाहीत. अजूनही अनेक विषयांचे निकाल जाहीर होणे बाकी असल्याने यासंदर्भात अाता काेणती डेडलाइन देणार, असे विचारले असता डेडलाइनमध्ये अाम्ही पडलेलाे नाही, पण निकाल लवकर लागतील. अडचणीवर उपाययाेजना केल्या अाहेत. अातापर्यंतचे काेणत्याही प्रकारच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या नाहीत.  निकाल उशिरा लागण्यात काेणचा दाेष अाहे यासंदर्भात संपूर्ण निकाल लागल्यावर सर्व कार्यवाही अाणि कारवाई राज्यपालांकडून करण्यात येईल. अाता अामचे सर्व लक्ष निकालावर  असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.
 
बातम्या आणखी आहेत...