आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Decision On Minister Council Meeting, Chief Minister Office Cleared

आठवड्यातून दोन मंत्रिमंडळ बैठकांचा निर्णयच नाही!,मुख्यमंत्री कार्यालयाचे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झटपट निर्णय घेता यावेत यासाठी आठवड्यातून दोनदा मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येईल, असे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घोषित करण्यात आले; पण असा कोणताही निर्णयच झाला नसल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील अधिका-याने ‘दिव्य मराठी’कडे दिली. त्यामुळेच नंतरच्या आठवड्यात दोन बैठका झाल्या नाहीत.
जनहिताच्या अनेक योजना पडून असल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांपुढे जाण्यात अडचण येईल, असा सूर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्री, आमदारांनी लावला होता. मुख्यमंत्री निर्णय घेत नसल्याने जनतेची कामे होत नाहीत, असा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. त्यानंतर आठवड्यातून दोनदा मंत्रिमंडळाची बैठक घेऊन तातडीने निर्णय घेण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, एका केवळ एकाच आठवड्यात त्याची अंमलबजावणी झाली.
दरम्यान, असा कोणताही निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला नव्हता. पाहिजे तर, उद्या पुन्हा बैठक घेऊ, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी तेव्हा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते. मात्र, प्रस्ताव तयार नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कच्ची प्रत असेल तरी चालेल असे सांगितले. एवढेच नव्हे तर त्यांनी त्याच आठवड्यात पुन्हा एकदा बैठक घेऊ असेही म्हटल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातील अधिका-याने सांगितले. दुस-या दिवसाच्या बैठकीच्या तयारीसाठी संध्याकाळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सह्याद्रीवर रात्री उशिरापर्यंत बसले. परंतु दुस-या दिवशी मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे प्रस्ताव आलेच नाहीत. दुस-या दिवशी दोनदा बैठक होणार असल्याची बातमी आल्यावर आश्चर्य वाटले, असेही अधिका-याने सांगितले.
राज्यातील मंत्री, आमदारांकडे जनतेच्या हिताचे प्रस्ताव नसल्यानेच आणि एकाच बैठकीत निर्णय होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा बैठकीचा प्रस्ताव फेटाळला होता. प्रस्ताव असतील तर रोज मंत्रिमंडळ बैठक घेण्याची तयारीही मुख्यमंत्र्यांनी दर्शवली आहे, असेही या अधिका-याने सांगितले.