आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी प्रभाव महाराष्‍ट्रात जाणवत नाही - माणिकराव ठाकरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा प्रभाव महाराष्‍ट्रात दिसत नाही. मोदी मॅनिया राज्यात नसल्यामुळेच गुजरातच्या सीमेवर असलेल्या धुळे, नंदुरबार या भागातील जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले. महाराष्‍ट्रातील जनतेला काँग्रेसच जवळची वाटते, हे दिसून आले आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसची पाठ थोपटली.
धुळ्यात 56 पैकी 30, तर नंदुरबारमध्ये 29 जागा मिळवून काँग्रेसने या दोन्ही जिल्हा परिषदांमधील सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या. या विजयानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना माणिकरावांनी काँग्रेसचा पारंपरिक गड पुन्हा काबीज केल्यानंतर समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, मोदींचा प्रभाव तर चालू शकला नाही.याशिवाय राष्‍ट्रवादी काँग्रे सकडून सत्ता काबीज करण्यात आम्हाला यश मिळाले.