आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Festivel Celebration Since 9 Years, Parag Sawant Family Story

११/७ रेल्वेतील बाॅम्बस्फाेट : परागची तब्बल ९ वर्षांची झुंज ठरली अपयशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यापूर्वी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात जाऊन परागची चाैकशी केली हाेती. छाया : संदीप महाकाल - Divya Marathi
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यापूर्वी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात जाऊन परागची चाैकशी केली हाेती. छाया : संदीप महाकाल
मुंबई - मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणा-या लोकलमध्ये नऊ वर्षांपूर्वी झालेल्या साखळी बाॅम्बस्फोटातील अखेरचा गंभीर जखमी रुग्ण पराग प्रकाश सावंत (३४) याने मंगळवारी पहाटे हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेली नऊ वर्षे पराग कोमामध्ये अंथरुणाला खिळून होता. ११ जुलै २००६ रोजी पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल गाड्यांमध्ये साखळी बाॅम्बस्फोट झाले होते. त्यात १८८ प्रवाशांचा मृत्यू, तर ८१७ जण जखमी झाले होते. पराग चर्चगेट ते विरार लोकलने प्रवास करत होता. मीरा रोड येथे झालेल्या बाॅम्बस्फोटात पराग गंभीर जखमी झाला होता. बॉम्बस्फोटात परागची कवटी भंगून मेंदूला जबर दुखापत झाली होती. त्याच्यावर हिंदुजामध्ये दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.

२००८ मध्ये तो कोमातून बाहेर आला होता. त्यानंतर पुन्हा तो कोमात गेला. २०११ मध्ये पुन्हा कोमातून बाहेर येत तो बोलू लागला होता. परागची प्रकृती ब-यापैकी सुधारत होती. त्यामुळे तो बरा होईल अशी त्याच्या कुटुंबीयांना आशा होती. मात्र, सहा महिन्यांनी परत त्याची तब्येत बिघडली. मंगळवारी पहाटे त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यास कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात अाला. मात्र सकाळी सहा वाजता त्याची प्राणज्योत मालवली. तेव्हा त्याच्याजवळ त्याची आई होती, अशी माहिती हिंदुजा रुग्णालयाचे न्यूरोसर्जन बी. के. मिश्रा यांनी दिली. परागच्या मागे आई, सेवानिवृत्त वडील प्रकाश सावंत, भाऊ प्रतीक, पत्नी प्रीती (३२)व मुलगी प्रचिती (९) असा परिवार आहे. भाईंदर येथील स्मशानभूमीत परागवर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अंत्यसंस्कारास विलंब
परागचा भाऊ अरबी समुद्रात असलेल्या ‘बाॅम्बे हाय’ या तेल प्रकल्पावर कामास आहे. त्याला परागच्या निधनाची माहिती देण्यात आली. मात्र मुंबईत येण्यासाठी मंगळवारी हेलिकाॅप्टर उपलब्ध नव्हते. त्यामुळे तो बुधवारी आल्यानंतर परागवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

उपचाराचे बिल अडीच कोटींवर
पराग गेली नऊ वर्षे हिंदुजा रुग्णालयात होता. त्याचा रुग्णालयाचा एकूण खर्च दोन कोटी पन्नास लाख रुपये झाला आहे. मात्र सर्व खर्च पश्चिम रेल्वेने दिल्यामुळे सावंत कुटुंबीयांना काही आर्थिक झळ बसली नाही.
पुढे वाचा... तपास यंत्रणांच्या भिन्न निष्कर्षांमुळे खटला अधांतरी