आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाच्या झळा: अायपीएल मेमध्ये राज्याबाहेर, उच्च न्यायालयाचा निकाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष आणि दुष्काळात होरपळत असलेल्या महाराष्ट्रामध्ये ३० एप्रिलनंतर आयपीएल क्रिकेट लीगचा एकही सामना होणार नाही. एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने हा निकाल दिला. यामुळे आता मे महिन्यांत २९ तारखेला महाराष्ट्रात होणाऱ्या अंतिम लढतीसह अन्य १३ सामन्यांसाठी बाहेर राज्यांत नवी ठिकाणे निश्चित करावी लागतील.

या निकालापूर्वी मुंबई इंडियन्स, पुणे सुपरजायंटस् या फ्रॅन्चायझी व बीसीसीआयने दुष्काळग्रस्तांना मदतीची हमी न्यायालयात दिली होती. मुंबई व पुणे संघांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रत्येकी ५ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. तर बीसीसीआयने लातूर किंवा अन्य भागाला रोज ४० लाख लिटर पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र,न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे आणि न्या. एम. एस. कौशिक यांच्या न्यायपीठाने ३० एप्रिलपर्यंतच महाराष्ट्रात सामने खेळवले जावेत, असे आदेश दिले.

असे असेल नवे वेळापत्रक
>१६, २० व २८ एप्रिल रोजी होणारे आयपीएलचे सामने वानखेडे स्टेडियमवरच होतील.
>पुण्याला २४ व २९ एप्रिल रोजी पूर्वनियोजित सामने होतील. मे महिन्यात नियोजित १, १०, १७, २१, २५ व २७ मे रोजी होणारे सामने बीसीसीआयला महाराष्ट्राबाहेर हलवावे लागतील.
>मुंबईला २९ मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासह ८, १३, १५ मे रोजी होणारे सामने बाहेर राज्यांत होतील.

आयपीएलसाठी वाट्टेल ते करण्याची होती तयारी!
>आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रातच व्हावेत म्हणून बीसीसीआय व पुणे, मुंबईच्या फ्रॅन्चायझींनी न्यायालयात आश्वासनांची खैरात केली. आर्थिक मदतीशिवाय महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने सरकार सांगेल त्या भागात शेतकऱ्यांना ६० लाख लिटर्स पाणी देण्याची तयारी दर्शविली होती. बीसीसीआयनेही गतविजेते मुंबई इंडियन्स व पुणे सुपरजायन्टस‌्ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
>संघांची ‘ब्रॅन्ड व्हॅल्यू’ व आर्थिक गुंतवणुकीवर परिणाम होईल, संघाची पत घसरेल, आर्थिक गणित चुकेल, रसिकांचा पाठिंबा हुकेल, असा युक्तिवादही केला.
>न्यायालयाने बीसीसीआयकडे विचारणा केली की, दुष्काळग्रस्तांना तुम्ही मदत करू इच्छिता का? पाणी देण्याची तयारी आहे का? त्यावर बीसीसीआयने पैसा व पाणी देण्याची तयारी दर्शवली. मात्र सामने हलवण्यास तयारी दर्शवली नव्हती.

बीसीसीआयला धक्का : मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे बीसीसीआयला जबरदस्त धक्का बसला आहे. मुंबई, पुणे, नागपुरातील सामने इतरत्र हलवण्यामुळे धावपळ होणार आहे.

राज्य सरकारवरही जबाबदारी : महाराष्ट्रात आयपीएल लढतींसाठी मैदानांवर वापरले जाणारे पाणी खरोखरच रेस कोर्सकडून प्रक्रिया केलेले पाणी आहे का, याची शहानिशा करण्याची जबाबदारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर टाकली आहे.

मिरजेहून दुसरी पाणी एक्स्प्रेस लातूरात : मिरज रेल्वे स्थानकावरुन सकाळी निघालेली दुसरी पाणी एक्सप्रेस सांयकाळी सातच्या सुमारास लातूर स्थानकावर दाखल झाली. यात १० वॅगन पाणी आहे. एका वॅगनची क्षमता ५४ हजार लिटरची आहे. या वॅगनमधून ५ लाख ४० हजार लिटर पाणी लातूरला मिळाले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, काय म्‍हणतात सामान्‍य लोक....
बातम्या आणखी आहेत...