आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणाचा चेंडू पुन्हा राज्य मागासवर्ग आयोगाच्या कोर्टात; हायकोर्टच्या निकालाकडे लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मराठा आरक्षण मुद्दा मागासवर्गीय आयोगाकडे सोपवण्यास आपली हरकत नसल्याचे राज्य सरकारने कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

मराठा आरक्षण मुद्दयांवर मुंबई हायकोर्टात सुरु असलेल्या मुळ याचिकेवरील सुनावणी दरम्यान इतर याचिका आल्याने कोर्टाने मराठा आरक्षण हा मुद्दा कोर्टात चालवायचा की, मागासवर्गीय आयोगाकडे सोपवावा असा एक मुद्दा उपस्थित झाला होता. त्यानुसार मुबंई हायकोर्टाने सर्व याचिकाकर्त्यांना त्यांचे म्हणणे प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता मराठा आरक्षण याचिकेवर याच महिन्यातील म्हणजे एप्रिल 27 तारखेला होणार्‍या सुनावणीच्या वेळेस मुंबई हायकोर्ट काय निकाल देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
बातम्या आणखी आहेत...