आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव: अनंत चतुर्दशीपर्यंत राज्य लोडशेडिंगमुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गणेशोत्सवाच्या काळात लोडशेडिंगचे विघ्न टळणार आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत कुठल्याही परिस्थितीत लोडशेडिंग केले जाणार नाही, असे ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी सांगितले. रविवारी मध्यरात्रीपासून निर्णय अमलात येत आहे. विनाव्यत्यय विद्युत पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही ते म्हणाले.

सणासुदीच्या अथवा उत्सवांच्या काळात राज्य लोडशेडिंगमुक्त ठेवण्याचा दरवर्षीचा प्रघात आहे. तसेच, राज्यात पुरेशी वीजदेखील उपलब्ध आहे. त्यानुसार लोडशेडिंग रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय गौरी-गणपतीनिमित्त कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना टोल द्यावा लागणार नाही. अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झाल्याने पुणे-कोल्हापूरमार्गे कोकणात जाता यावे यासाठी राज्य सरकारने टोल माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.