आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुपयाचे आता मोल राहिलेले नसले, तरी त्याची किंमत ओळखणाराच खरा श्रीमंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठ उद्योगपती प्रतापशेठदादा साळुंखे यांना पुरस्कार प्रदान करताना शरद पवार, सुप्रिया सुळे आणि काकोडकर. - Divya Marathi
ज्येष्ठ उद्योगपती प्रतापशेठदादा साळुंखे यांना पुरस्कार प्रदान करताना शरद पवार, सुप्रिया सुळे आणि काकोडकर.
मुंबई - सध्यस्थितीत रुपयाचे मोल राहिलेले नाही. कोणी नोटा फेकून देत आहे, तर कोणी फाडूनही टाकत आहे. मात्र, रुपयाची किंमत ओळखणारा माणूस हाच खरा श्रीमंत आणि हा श्रीमंत माणूस म्हणजे प्रतापशेठ साळुंखे हे असून यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना गौरवताना प्रतिष्ठानला अतिशय आनंद होत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३२ व्या पुण्यतिथीनिमित्त नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शुक्रवारी नामवंत सुवर्ण उद्योजक व साताऱ्याच्या खानापूर विद्यापीठातील पारे गावचे सुपुत्र प्रतापशेठ साळुंखे यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. एक लाख रुपये, मानपत्र देऊन साळुंखेंचा सत्कार करण्यात आला. या वेळी पवारांनी सातारा, सांगलीच्या दुष्काळी भागांमधील लोकांच्या आत्मविश्वासाची कथा उपस्थितांसमोर मांडली. नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, ग.दि.माडगूळकर असे एकापेक्षा एक हिरे जन्माला आले ते याच भागातून. याच प्रदेशातील एकाजिद्दी माणसाने अविरत परिश्रमाच्या जोरावर साऱ्या भारतात सुवर्णउद्योग उभारला. मुख्य म्हणजे स्वत: उद्योग उभारताना आपल्या आजूबाजूचे लोक उभे राहतील, यासाठीही साळुंखेंनी मेहनत घेतली. त्यांची देशपातळीवर संघटना बांधली, याकडे पवारांनी लक्ष वेधले.

आटपाडी, माण, खटाव, जत या दुष्काळी भागातील माणसांना प्रतिकूल परिस्थितीत चिकटवणे कसे जगायचे, हे आपसूक कळते. गेल्या काही वर्षांतील दुष्काळी परिस्थितीमुळे आत्महत्यांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रदेशामधील माणसांच्या जिद्दीची कायम उदाहरणे देता येतील. आत्मविश्वासाची कमतरता असणारी माणसे आत्महत्या करतात. पण, आपल्या भागात काही पिकत नसताना साळुंखेंनी सोने-चांदी गलाई म्हणजे शुद्धीकरणाच्या व्यवसायात उतरताना दक्षिण भारत पादाक्रांत केला. भारतभर साळुंखे यांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे, असे पवार म्हणाले.

पुरस्कार रक्कमेचा ट्रस्टसाठी वापर करून त्यामधून गरीबांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्यात येईल, अशी घोषणा साळुंखेंनी आपल्या मनोगतात केली. या वेळी त्यांनी नॅशनल गोल्ड अँड सिल्वर रिफायनर्स अँड ज्वेलर्स असाेसिएशनच्या समस्या सोडवण्याची विनंती पवार यांना केली.
यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार
आधार कार्डचे जनक नंदन निलेकणी यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार या कार्यक्रमात जाहीर करण्यात आला. पुरस्कार समितीचे अध्यक्ष व शास्त्रज्ञ अिनल काकोडकर यांनी पुरस्काराची घोषणा केली. १२ मार्चला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहातील कार्यक्रमात िनलेकणी यांना हा पुरस्कार देण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...