आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Majority Any Party In Assembly Election Bookies

गुजरातींचे वर्चस्व असलेल्या सट्टेबाजारात भाजपालाच पसंती, 110 जागांचा अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईसह देशाच्या सट्टेबाजारात गुजरातींचे वर्चस्व असलेल्या सट्टेबाजांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही लोकसभेप्रमाणे भाजपलाच पसंती दिली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत प्रथमच पंचरंगी लढती होत असल्याने कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे कोणताही राजकीय पंडित ठामपणे सांगू शकत नसले सट्टेबाजाराने भाजपला 110 ते 115 च्या घरात जागा मिळतील असा अंदाज वर्तविली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप बहुमताच्या जवळ जाईल असा अंदाज व्यक्त करणाऱ्या सट्टेबाजांनी मात्र महाराष्ट्र विधानसभा त्रिशंकू अवस्थेत राहील असे बुकींचा हवाला देऊन इंग्रजी वृत्तपत्र 'ईटी'ने वृत्त दिले आहे.

भारतीय जनता पक्षाला 110 ते 115 जागा, त्याखालोखाल शिवसेनेला 50 जागा, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी 45 ते 50 च्या घरात जागा मिळतील असे भाकीत वर्तविले आहे. शिवसेना दुस-या स्थानावर राहील तर, राष्ट्रवादी तिस-या, काँग्रेस चौथ्या क्रमांकावर राहील असा अंदाज सांगितला आहे. 15-20 जागांसह मनसे पाचव्या स्थानावर असेल. याशिवाय अपक्ष, छोटे पक्षांसह इतरांच्या खात्यात 15-20 जागा जातील असे सट्टेबाजाराचे म्हणणे आहे.