आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनी कपिल शर्माला ठेवले प्रतीक्षेत, ट्विट आणि बेकायदा बांधकामप्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पंतप्रधानांना केलेले ट्विट आणि बेकायदा बांधकामप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न कपिल शर्मा करीत आहे. परंतु आपण कपिलला अद्याप वेळ दिलेली नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्याने पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. या प्रकरणी झालेल्या चौकशी दरम्यान कपिल शर्मा हाच बेकायदा बांधकामाच्या गुन्ह्यामध्ये अडकला. एमआरटीपी कायद्यांतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्रकरण बुमरँग झाल्याने त्यातून बाहेर पडण्यासाठी अभिनेता विवेक आेबेरायसह मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. परंतु मुंबई येथील एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांनी भेटीबाबत वृत्त फेटाळले. कपिलला आपण भेटीची वेळच दिलेली नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे कपिलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...