आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे चालकांना मोबाइलची मनाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- धावत्या रेल्वेमध्ये चालकासह इतर चालक दल सदस्यांना मोबाइल फोनचा वापर करण्यास रेल्वेखात्याने मनाई केली आहे. वाढत्या रेल्वे अपघातांवर अंकुश लावण्यासाठी रेल्वेने हे नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत.
यानुसार रेल्वेच्या या कर्मचा-याना आपल्या खासगी आणि अधिकृत फोन क्रमांकांची माहिती सरकारला द्यावी लागणार आहे. प्रवासादरम्यान त्यांना हे नंबर ‘स्विच ऑ फ’ ठेवणे बंधनकार आहे. रेल्वेकडून या क्रमांकांची ई-मॉनिटरिंग होणार आहे. या धावत्या रेल्वेदरम्यान या क्रमांकावर बोलणे झाले की नाही, याची माहिती ई-मॉनिटरिंगद्वारे मिळेल.

रेल्वे मंत्रालयाचे संचालक (टेलिकॉम) राकेश रंजन यांनी सांगितले की, रेल्वे चालकांनाआता फक्त आपत्कालीन परिस्थितीतच जसे की, एखादा अपघात, सिग्नल फेल्यूअर सारख्या घटनांत त्यांना मोबाइल वापरण्याची मुभा राहिल. प्रवासानंतर मोबाइल वापरल्याचे कारण सांगणे बंधनकारक असेल.

कल्पना करा, प्रवाशांनी खच्चून भरलेली रेल्वेगाडी आणि तिचा ड्रायव्हर मोबाइलवर बोलतोय वा एसएमएस करतोय. यामुळे केवढा मोठा अनर्थ संभवू शकतो, याचा स्वत: तुम्हालाच अंदाज येईल. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करण्यासाठी रेल्वेने मोबाइल बंदीचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेचा एक वरिष्ठ अधिकारी.