आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ड्राय होळी खेळा- फडणवीस; स्वीमिंग पुल बंद होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेनडान्स (फाईल फोटो) - Divya Marathi
रेनडान्स (फाईल फोटो)
मुंबई- महाराष्ट्रात पडलेला दुष्काळ व शहरी भागातही जाणवत असलेली पाणी टंचाई पाहता पुढील आठवड्यात साजरी होणा-या होळीदरम्यान पाण्याचा अपव्यय टाळा व ड्राय होळी खेळा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
दरम्यान, मोठ्या शहरातही पाणी टंचाई जाणवू लागल्याने जलसंपदा विभागाने महापालिका क्षेत्रातील स्वीमिंग पुल पुढील चार महिने बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, महापालिकेला पत्र लिहून पाण्याचा योग्य वापर करण्यासोबत शहरातील रेनडान्स व स्वीमिंग पुल बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई-पुणे शहरातील खासगी स्वीमिंग पुल व वॉटर डॅम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बातम्या आणखी आहेत...