आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भटक्या विमुक्तांना आता क्रीमिलेअरची गरज नाही, राजकुमार बडोले यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भटक्या विमुक्तांना (एनटी) राज्यात क्रीमिलेअर संज्ञेमधून वगळण्यात आल्याचे परिपत्रक महिनाभरात काढण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.

काँग्रेसचे हरिभाऊ राठोड यांनी याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. सर्वोच्च न्यायालयाने विमुक्तांना क्रीमिलेअरमधून वगळल्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, न्यायालयाच्या आदेशात नेमक्या जातींचा उल्लेख नाही. त्यामुळे राज्यात आदेशाची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. पुणे येथील राज्य मागासवर्ग आयोगाने यासंदर्भात नोव्हेंबरमध्ये अहवाल दिला आहे. त्यावर सामाजिक न्याय विभागाकडून कार्यवाही चालू असून महिनाभरात परिपत्रक काढले जाईल, असे बडोले यांनी स्पष्ट केले. राज्यात अडीच कोटी भटके विमुक्त आहेत. १९९३ मध्ये मंडल आयोग लागू झाला. भटक्या विमुक्तांना मात्र इतर मागास वर्गाबरोबर जोडले गेले. त्यामुळे भटक्या विमुक्तांना क्रीमिलेअरची अट विनाकारण लागली, असे सांगत ब्रिटिशांइतकाच राज्य शासनानेही भटके विमुक्तांवर अन्याय केल्याचा आरोप राठोड यांनी केला.
बातम्या आणखी आहेत...