आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Order Regarding Ashok Chavan, Special CBI Court Information

अशोक चव्हाणांबाबत तूर्त आदेश देता येणार नाहीत,विशेष सीबीआय न्यायालयाची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आदर्श घोटाळ्यातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव वगळण्याची सीबीआयची याचिका फेटाळली आहे. मात्र, उच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू असल्याने चव्हाणांबाबत कोणतेही लेखी आदेश देता येणार नसल्याचे स्पष्टीकरण विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी दिले आहे.
राज्यपालांनी परवानगी नाकारल्याने चव्हाण यांचे नाव घोटाळ्यातून मागे घेण्याबाबत सीबीआयने याचिका दाखल केली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने ही याचिका फेटाळली. सध्या आदर्शची सुनावणी उच्च न्यायालयातही सुरू आहे. न्यायिक व्यवस्थेची शिस्त आम्हाला पाळावीच लागेल, त्यामुळे यावर आत्ताच काहीच बोलता येणार नसल्याचे सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस. जी. दिघे यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यपालांनी कारवाई करण्यासाठी सीबीआयला परवानगी नाकारली असली तरी न्यायालयाने चव्हाणांचे नाव आरोपपत्रातून वगळण्यास परवानगी नाकारल्याने या प्रकरणात अशोक चव्हाण यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.