आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Police Commissioner Get To Mumbai In The Quareel Of Congress Nationalist

काँग्रेस-राष्‍ट्रवादीतील वादाने मुंबईला पोलिस आयुक्त मिळेना; कांबळे, मारिया यांची नावे आघाडीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सत्यपाल सिंह यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन भाजपात प्रवेश केल्यामुळे गेले पाच दिवसांपासून मुंबई पोलिस आयुक्तांचे पद रिक्त आहे. सत्ताधारी काँग्रेस व राष्‍ट्रवादीमधील मतभेदामुळे नव्या आयुक्तांची नियुक्ती रखडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विजय कांबळे किंवा अहमद जावेद यांच्यापैकी एकाची या पदावर नियुक्ती व्हावी, अशी काँग्रेसची इच्छा आहे. मात्र राष्‍ट्रवादीचा मात्र दोघांनाही विरोध आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व राष्‍ट्रवादीलाही मर्जीतील आयुक्त हवा आहे. विशेष म्हणजे काँग्रेस नेत्यांमध्येच या विषयावर दुफळी आहे. काँग्रेस मंत्र्यांच्या एका गटाचा अहमद जावेद यांना पाठिंबा आहे, तर काँग्रेसच्या दुस-या गटाला विजय कांबळे हवे आहेत. तर जावेद आणि कांबळे या दोघांच्या नियुक्तीला विरोध असणा-या राष्ट्रवादीच्या नेत्यांची राकेश मारियांच्या नावाला पसंती आहे.