आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाचे राजकारण करू नये : ढोबळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थिती भीषण होत असल्याने सरकार दुष्काळावर मात करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करत आहे, अशा वेळेस केवळ काँग्रेसच दुष्काळाच्या उपाययोजना करत असल्याचा अपप्रचार करून दुष्काळाचे राजकारण करू नये, असे आवाहन पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केले आहे.

राज्य सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महत्वाचा पक्ष आहे हे काँग्रेसने विसरू नये, असा टोलाही ढोबळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना लगावला आहे. काँग्रेसच दुष्काळाच्या उपाययोजना करत असल्याचे वक्तव्य ठाकरे यांनी आटपाडी येथे नुकतेच केले होते त्या पार्श्वभूमीवर ढोबळे बोलत होते. दरम्यान, राज्यातील विशेषत: मराठवाड्यातील दुष्काळाची स्थिती गंभीर होत असून केवळ 11 टक्के पाणी साठा आहे.